प्रदूषणाच्या मुख्य प्रकारांना सोडून, नवीन जो प्रकार जेमतेम ह्या दशकात खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तो म्हणजे माहितीचे प्रदूषण. असलेली माहिती खोटं करून दाखवणे किंवा निरुपयोगी माहितीचा प्रचार आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा प्रसार होणे हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे.
आजच्या जगात बहुतांश माहिती ही आपल्याला व्हॉट्सऍप, फेसबुक इत्यादी सारख्या आधुनिक माध्यमातून सहसा मिळत असते. परंतु मिळालेली माहिती चुकीची आहे की नाही याचा आपण कधीच आढावा घेत नाही. उलट मिळालेली माहिती सत्य आहे असे समजून त्यानुसार कृती करतो किंबहुना त्याला आमलात आणतो. काही वेळेस ती माहिती अत्यंत चुकीची असू शकते, जेणेकरून आपल्याला ती चुकीच्या मार्गी घेऊन जाऊन चुकीचे कृत्य करायला भाग पाडते. जितकी देशात साक्षरता कमी तेवढीच माहिती प्रदूषण पसरण्यास अनुकूल वातावरण असते.
कित्येक राजकारणी आणि कुविचारी लोक समाजामधील एकता बिघडवण्यासाठी आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी चुकीची माहिती पसरवीत असतात. योग्य माहितीच्या अभावामुळे लोकांमध्ये दरी निर्माण होऊ शकते. परराष्ट्र पण राष्ट्रीय एकात्मता बिघडवण्यासाठी सक्रिय वाटचाली करू शकतात. कित्येक दंगे, नुकसान वगैरे ह्याच चुकीच्या माहितीमुळे होत आहेत. कित्येक लोकांना आपण हे कृत्य का करत आहोत हे देखील माहित नसत कारण लोक हे अनुकरणशील असतात. एखाद्याने एक पाऊल उचलले की दुसरेही काहीही विचार न करता त्याचे अनुकरण करतात.
या गोष्टीला आपल्याला टाळायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने मिळालेल्या माहितीची जाच पडताळणी केली पाहिजे. आपल्याकडे कित्येक माहितीचे स्त्रोत आहेत त्यावरून आपण मिळालेली माहिती किती प्रमाणात योग्य आहे याचा अंदाज घेऊ शकतो. शिवाय गूगल सारख्या माहितीच्या भंडारा मध्ये सर्व प्रकारच्या माहिती असू शकतात ज्यात निरर्थक माहितीचा ही समावेश आहे. म्हणून ज्याची आपल्याला गरज आहे आणि जी माहिती विश्वसनीय स्त्रोता मधून मिळत आहे त्यावरच आपल्याला विश्वास ठेवायला हवा. शिवाय माणसांमधील जिज्ञासू वृत्ती वाढत राहिली पाहिजे. शिवाय प्रत्येक क्षेत्रात अनुभवी व्यक्ती असतात, त्यांच्या माध्यमातून काही जनजागृती मोहीम देखील आपण आमलात आणने सोयीचे ठरेल.
शेवटी "पढेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया...!!!"
---महेश जोकारे,
416121jokarem[at]gmail[dot]com, सोलापूर.